Home » Poems For Kids » Poems In Hindi » गौरी पुत्र गजानन देवात महान
Lord Ganesha Marathi Bhajan गौरी पुत्र गजानन देवात महान

गौरी पुत्र गजानन देवात महान

गौरी पुत्र गजानन देवात महान हा शिवपुत्र गजानन देवातं महान, मंगल मंगल बोला मंगल मंगल ॥धृ॥

मुगुटाला हिरे शोभे रत्‍नजडितांचे, कानात कुंडल तेज पडे सुर्याचे, हो पडे सुर्याचे, गणपतीच्या गळ्यामध्ये शोभे पुष्पमला ॥१॥

गणपतीच्या भाळी शोभे केशराचा टिळा पिवळा पितांबर कटी शोभुनी दिसला पायात पैंजण आवाज रुणझुण झाला ॥२॥

शमी पत्री दुर्वा हरळी आवड मनाची सर्वांगी उटी शोभे लाल शेंदुराची, हो लाल शेंदुराची, पुढे गुळ खोबर्‍याचा नैवेद्यदाखविला ॥३॥

सोन्याच्या सिंहासनी गणेश विराजला, शारदा सरस्वति दोन्ही बाजुला, शांताने हा गणपति हृदयी ध्यानिला ॥४॥

Check Also

Asha Bhosle Navratri Devotional Bhajan: पार करो मेरा बेडा भवानी

पार करो मेरा बेडा भवानी: आशा भोंसले

पार करो मेरा बेडा भवानी, पार करो मेरा बेडा। गहरी नदिया नाव पुरानी, दया करो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *