सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ0। रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरे जडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया । जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ0।।2।। लंबोदर पीतांबर फणी वरवंदना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दार रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना । जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ0।। |